नोकरीच्या आमिषाने तरुणीला लॉजवर बोलवणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप; पहा व्हिडीओ सिद्धेश म्हात्रे
मुंबई/पुणे

नोकरीच्या आमिषाने तरुणीला लॉजवर बोलवणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप; पहा व्हिडीओ

पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी (Washi) येथील लॉजमध्ये बोलवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई : नेरुळ येथील डी वाय पाटील संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी या नराधमाला चांगलाच चोप दिला आहे.

नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पिटल ( DY Patil Hospital) मध्ये नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. या नराधमाने पीडित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकून माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख देण्याची मागणी केली.

पहा व्हिडीओ -

तसेच या पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी (Washi) येथील लॉजमध्ये बोलवले. यावेळी हा नराधम लॉज मध्ये आला असता मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहाथ पकडुन चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT