Sanjay kelkar प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

नवाब यांचा नकाब उतरला आहे - आमदार संजय केळकर

जर तुम्ही निर्दोश असाल तर कायद्याची लढाई लढून तुम्ही निर्दोश सुटू शकता.

प्रदीप भणगे

दिवा -  दिव्यात आज भाजपने (BJP) वॉटर, मीटर, गटर आंदोलन केले. या आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी शिवसेनेचा (Shivsena) हंडा फोडून भाजपने निषेध केला. शिवसेनेची सत्ता असून दिव्यात 8 नगरसेवक सुध्दा साधे पाणी देऊ शकले नाहीत असे भाजप आमदार केळकर यांनी सांगितले. तसेच नवाब मलिक (Nawab Malik) यांचा नकाब उतरला आहे असेही व्यक्तव्य त्यांनी केले आहे.

हे देखील पहा -

भाजप आमदार संजय केळकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत सांगितले की, शासकीय यंत्रणेने सर्व पुरावे गोळा करुन त्यांना अटक केली आहे. नवाब यांचा नकाब तर उतरला आहे. आता कोर्टाच्या विरोधात आंदोलन करायचे बाकी राहीलेले आहे. तुम्ही कोर्टालाही मानत नाही, तुम्ही घटनेला मानत नाही, कायद्याला नियमाला मानत नाही आणि त्याच्या विरोधातच आपले छाती बडवून भाजपा विरोधात आवाज उठवितात जर तुम्ही निर्दोश असाल तर कायद्याची लढाई लढून तुम्ही निर्दोश सुटू शकता.

पण हे अतिशय वेदना दायक आहे की, या मुंबईत २५४ निरपराध नागरीक ज्या बॉंम्बस्फोटामुळे मारले गेले त्यांचे निधन झाले. यात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांच्याशी यांचे हितसंबंध आहेत, असाही आरोप त्यांच्यावर ठेवलेला आहे. अशा प्रकारचे काम करणाऱ्यांची जागा ही जेलच असली पाहीजे असे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT