Nitesh Rane Saam Tv
मुंबई/पुणे

फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी..करून दाखवलं!!; नितेश राणेंची सेनेवर टीका

इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात एक बैठक झाली असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर आमदार नितेश राणे यांनी ट्विट (Tweet) करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी.. कट्टरपंथींना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..खरंच, करून दाखवलं!! असं नितेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

राजेश टोपे यांना इम्तियाज जलिल यांनी दिली ऑफर

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे इम्तियाज जलिल (Imtiyaz Jaleel) यांच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा सुरु झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना युतीची ऑफर दिली असल्याचे इम्तियाज जलिल (Imtiyaz Jaleel) यांनी सांगितले. पण यावर आरोग्यमंत्री काहीच बोलले नसल्याचे जलिल म्हणाले.

यावर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आज (शनिवार) सकाळी त्यांनी ट्विट करुन टीका केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:दुष्काळाचा संत्र पिकाला मोठा फटका

Pitru Paksha : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

Imarti Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि रसाळ इमरती,वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT