Shivshahi Rape Case: Viral Photo of Accused with MLA Mauli Katke, No Political Connection Says Katke Saam
मुंबई/पुणे

Pune : शिवशाही बलात्कार प्रकारणातील आरोपीचा फोटो माऊली कटकेंसोबत, आमदार म्हणाले...

Swargate depot : शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार तसेच विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यासोबत गाडे याचे फोटो समोर आले आहेत.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे

स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा फोटो आमदार माऊली कटके याच्यासोबत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे हा कटके यांचा कार्यकर्ता असल्याचे सर्वांना सांगत होता. कटके यांनी याबाबत स्पष्टीकरण देत, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. दिवसभर मला भेटण्यासाठी शेकडो लोक येत असतात, त्यापैकीच हा एक असू शकतो, असे कटके म्हणाले.

शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार तसेच विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यासोबत गाडे याचे फोटो समोर आले आहेत. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर गाडे याचा फोटो दिसलाय. कटके यांच्यासोबतचे गाडे याचे फोटो पुण्यात व्हायरल झाले आहेत. ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा फोटो आरोपीने स्वतःच्या मोबाईल फोनवर ठेवला आहे.

त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार माऊली कटके काय म्हणाले?

स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेली घटना दुःखदायक, क्लेशदायक आहे. मीडियातून असं समजलं की तो आरोपी शिरूर तालुक्यातील आहे. शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे अनेकजण येत असतात फोटो काढत असतात, भेटत असतात, आशा कुठल्याही व्यक्तीचा माझा काही संबंध नाही. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक लोक भेटत असतात, फोटो काढत असतात, असे कटके म्हणाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे माऊली कटके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT