आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन अमोल कविटकर
मुंबई/पुणे

आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण परत एकदा वाढताना दिसत आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण परत एकदा वाढताना दिसत आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अनेक नेत्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. आता पुण्यातील देखील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (madhuri misal) यांची कोरोनाची टेस्ट पॉजिटीव्ह (Positive) आली आहे. आमदार मिसाळ यांनी विधानसभा अधिवेशनालाही (Assembly session) हजेरी लावली होती.

हे देखील पहा-

कोरोनाची बाधा झाल्यानंतर आमदार मिसाळ यांनी माध्यमांतून प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड (Covid) टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.

राज्यामध्ये (state) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण परत एकदा वाढत आहेत. पुण्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांसह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाकडून (administration) नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच मास्कचा वापर करण्याचे देखील आवाहन केले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

Viral Video: वधू-वरासह लग्नाचा संपूर्ण स्टेज कोसळला; AI च्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

SCROLL FOR NEXT