MLA Geeta Jain Hits Municipal Engineer saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: हसतोय नालायक म्हणत आमदार गीता जैन यांनी अभियंत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल

MLA Geeta Jain Hits Engineer video viral: अभियंत्याशी बोलताना त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली.

साम टिव्ही ब्युरो

MLA Geeta Jain Hits Municipal Engineer: आमदार गीता जैन यांनी सरकारी अभियंत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडित गीता जैन या अभियंत्याला जाब विचारताना दिसत आहे. मात्र या दरम्यान त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी अभियंत्याची कॉलर पकडत त्याच्या कानशिलात लगावली. यामुळे गीता जैन या वादाच्या भोवऱ्या त अडकल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या या कृतीवर स्पष्टीकरण देखील दिले आहे.

सविस्तर माहिती अशी की, महापालिका हद्दीतील एका कुटुंबाचं घर पाडण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यासह पथक गेलं होतं. राहतं घर पडून बेघर होण्याच्या भीतीनं या कुटुंबानं आमदार गीता जैन यांच्याकडं धाव घेतली. जैन या घटनास्थळी दाखल झाल्या अन् नियमावर बोट ठेवत कारवाईचा बडगा कशासाठी? असा जाब विचारला. यावेळी अभियंत्याशी बोलताना त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली. (Marathi Tajya Batmya)

याबाबत स्पष्टीकरण देताना गीता जैन म्हणाल्या, "मी अभियंत्याशी बोलताना पावसाळ्यात अनधिकृत असली तरी त्या घरांमध्ये कोणी राहत असल्यास ती तोडू नयेत असे शासन आदेश आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून देत होते. पण मी बोलत असताना अभियंता हसत असल्यानं आपला पारा चढला आणि मी त्याच्या कानशिलात लगावली'. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

Kalyan: छातीत दुखू लागल्याने १०८ ला कॉल केला, पण रुग्णवाहिकेला ४० मिनिटं उशिर; तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू, कल्याणमधील संतापजनक घटना

Rupali Bhosle Photos: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

SCROLL FOR NEXT