Vaibhav Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: महेश गायकवाड गोळीबार प्रकरण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

MLA Ganpat Gaikwad Firing Case: शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख, कल्याण

MLA Ganpat Gaikwad Firing Case:

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय. त्यामुळे घटना घडल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या वैभव गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालाय माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोत्री उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. ते आत्ता तळाेजा कारागृहात आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेले आमदार गायकवाड यांचे सूपूत्र वैभव हे घटनेच्या दिवसापासून फरार आहेत. वैभव गायकवाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली.  (Latest Marathi News)

मात्र न्यालायाने त्यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज त्यांच्या अर्जावर निकाल दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वैभव यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यावर वैभव गायकवाड हे उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करु शकता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT