Abdul Sattar vs Aditya Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त.., अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधल होता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे निष्ठा यात्रेदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर आमदारांवर ते सातत्याने शाब्दिक हल्ले चढवत आहे. शुक्रवारी आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी बोलताना 'हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकीला सामोरं जा' असं खुलं आव्हान बंडखोर आमदारांना दिलं होतं. दरम्यान, त्यांच्या आव्हानाला आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. (MLA Abdul Sattar News)

मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंड करत भाजसोबत हातमिळवणी केली. या बंडखोर आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जोरदार हल्ला चढवत आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली आहे. शुक्रवारी आदित्य ठाकरे हे औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं होतं. 'हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकीला सामोरं जा' असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. (Abdul Sattar vs Aditya Thackeray)

त्यांच्या आव्हानाला सिल्लोडचे शिवसेना बंडखोर आमदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तार म्हणाले की, मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा. माझी मातोश्रीवर जायची इच्छा नाही. आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघात यावं. या आधी आला नव्हता पण आता या, असा टोलाही सत्तार यांनी लगावलाय.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी नुकताच नाशिक, औरंगाबाद आणि नगरचा दौरा केला. या दौऱ्यात आदित्य यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेही नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. 30 आणि 31 जुलैला शिंदे या दोन शहरांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहितीही यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चांदीची चमक गेलीय? दागिन्यांवरील काळेपणा कसा घालवाल?

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Maharashtra News Live Update: प्लाझ्मावर बंदी करा पण स्पीकरवर निर्बंध नको, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी

Diabetes Healthy Food: मूग, तूर, हरभरा डाळ; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते कडधान्ये खावीत?

Running vs Walking for Weight Loss: धावणे की चालणे, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

SCROLL FOR NEXT