पेपर तपासणीत, रिचेकिंगवेळी आरोपींचा गैरव्यवहार; पुणे पोलिसांचा खुलासा Saam Tv
मुंबई/पुणे

पेपर तपासणीत, रिचेकिंगवेळी आरोपींचा गैरव्यवहार; पुणे पोलिसांचा खुलासा

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टीईटी परिक्षेमधील गैरव्यवहार प्रकरणी केलेल्या कारवाईविषयी माहिती दिली.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी टीईटी परिक्षेमधील (TET Exam) गैरव्यवहार प्रकरणी केलेल्या कारवाईविषयी माहिती दिली. आता पर्यंत या प्रकरणात २ लोकांना अटक (Arrested) करण्यात आली असून, आरोपींकडून ९० लाख जप्त केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामध्ये ४ कोटींपर्यंत गैरव्यवहार झाल्याचे समजतं आहे.

हे देखील पहा-

उमेदवारांकडून ३५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. ८८ लाख रुपये कॅश (Cash) आणि सोने (Gold) सापडले असून असे जवळपास साडेचार कोटी रुपये जमा झाले होते. आता प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे. ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाली आहे. ४ ते ५ जणांची लिंक लागली असल्याचे अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी सांगितले आहे.

दोन पेपर फुटी प्रकरणांचा तपास करताना म्हाडा (MHADA) पेपर फुटीची लिंक देखील यामध्ये सापडली आहे. त्यातून काही लोकांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्यामध्ये टीईटीच्या (TET Exam) परीक्षेत घोटाळा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT