Navneet Rana and Kishori Pednekar, Navneet Rana Latest Marathi News
Navneet Rana and Kishori Pednekar, Navneet Rana Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

'तो' व्हायरल फोटो नवनीत राणांना भोवणार? शिवसेना नेत्यांची पोलिसात तक्रार!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: खासदार नवनीत राणा यांच्या MRI मधील फोटोविरुद्ध शिवसेना नेत्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ आज मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. शिवसेनेकडून थेट आरोप केला जात होता की, नवनीत राणा यांचा MRI सुरु होता तरी तेथे फोटोसेशन कसेकाय करण्यात आले? कारण रुग्णालयाच्या MRI कक्षात कुठलीच इलेक्ट्रॉनिक किंवा धातूची वस्तू घेऊन जाऊ दिले जात नाही. मग नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर उपचार सुरु असताना समोरासमोर फोटो कसे काढले गेले? की रुग्णालयावर कोणता दबाव टाकण्यात आला होता? या सर्व प्रकरणावर आज चार शिवसेना (Shivsena) नेत्यांनी तक्रार नोंदवली आहे. (Navneet Rana Latest Marathi News)

'त्या वयाच्या 12 व्या वर्षांपासून त्या प्रसिद्धी झोतात, जेवण नाही मिळालं तरी...'

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) याविषयी बोलताना म्हणाल्या, खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील MRI मधील व्हायरल फोटो प्रकरणी आज शिवसेनेच्या नेत्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये रुग्णालय प्रशासन आणि खासदार राणा यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 14-15 दिवसानंतर झालेल्या मनोमिलनाचे जे फोटो व्हिडीओ समोर आले त्याला आमचा विरोध नाही. पण, केंद्रात कायदे बनविणाऱ्या खासदारांकडूनच नियमांचं उल्लंघन होत आहे. वयाच्या 12 व्या वर्षांपासून त्या प्रसिद्धीझोतात आहेत. जेवण नाही मिळालं तरी प्रसिद्धी मिळाली यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. पण तुमच्या मुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

तसेच शिवसेनेने सांगितले आहे की, मुंबईच्या लीलावती रुग्णालयाविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे शिष्ठमंडळ इंडियन मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळे आता लीलावती रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार का हे पाहावं लागणार आहे.

हे देखील पाहा-

शिवसेनेचे आरोप काय?

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना काही दिवसांपुर्वी लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांचे पती आमदार रवी राणा हे त्यांना भेटायला रुग्णालयात आले असतानाचे अनेक भावनिक फोटो आणि व्हि़डीओ व्हायरल (Viral Video) झाले होते. मात्र, याच रुग्णालयातील एक फोटो चांगलाच वादग्रस्त ठरला. हा फोटो लीलावती रुग्णालयातील एमआयआर कक्षातील असून या फोटोमुळे आता लीलावती रुग्णालय प्रशासन अडणीत सापडले. कारण, या फोटोच्या मुद्द्यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून नवनीत राणा यांना हॉस्पिटल प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी (Kishori Pednekar) पेडणेकर यांनी केला होता. तसंच नवनीत राणा यांचे जे फोटो काढले, ज्या आजारासाठी त्या आल्या त्यांच्यावर उपचार केले गेले ते नियम बाह्य आहे. सेन्सेटिव्ह एरियामध्ये फोटोग्राफी केली गेली. हॉस्पिटलचे नियम तोडले गेले. हॉस्पिटलच्या काळजीपोटी आम्ही येथे आलो आहोत. या हॉस्पिटलमध्ये अनेक VIP येत असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. स्टाफला धमकावत कोणी फोटोग्राफी केली का? आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. नर्स स्टाफ ला दबाव कोणी आणला का? असे अनेक प्रश्न मनिषा कायंदे यांनी यावेळी उपस्थित केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

Rakhi Sawant Successful Surgery : राखी सावंतवर कशी झाली सर्जरी ?, Ex Husband ने दिली हेल्थ अपडेट; खिल्ली उडवणाऱ्यांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT