घरच्यांनी कपडे घेतले नाहीत म्हणून ५ लाख घेऊन अल्पवयीन मुलाचे पलायन!  SaamTvNews
मुंबई/पुणे

घरच्यांनी कपडे घेतले नाहीत म्हणून ५ लाख घेऊन अल्पवयीन मुलाचे पलायन!

घरच्यांनी कपडे घेतले नाहीत म्हणून रागात गावातील मित्रासह घरातून ५ लाख रुपये घेऊन तो मुंबईत आला होता. मालाडमध्ये या मुलाने १ लाख २० हजाराचा iPhone मोबाइल खरेदी केला.

सुरज सावंत

मुंबई : घरच्यांनी हट्ट न पुरवल्याचा राग अनावर झाल्याने नांदेडहून पळून आलेल्या १५ वर्षाच्या मुलाला सायबर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून शोधले. हा मुलगा घरातल्यांनी कपडे घेतले नाहीत म्हणून रागात गावातील मित्रासह घरातून ५ लाख रुपये घेऊन मुंबईत (Mumbai) आला होता. ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार घरातल्यांनी नांदेड (Nanded) ग्रामीण पोलिस ठाण्यात केली.

हे देखील पहा :

तपासात ही मुलं मुंबईत आल्याचे कळाल्यानंतर नांदेड पोलिसांनी मुंबई सायबर पोलिसांकडे (Cyber Police) मदत मागितली. क्षणाचाही विलंब न करता सायबर पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी (Police) तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरली. दोन्ही मुलं मालाड दिंडोशी परिसरात असल्याची माहिती समोर आली. दोन्ही मुलांनी काही वेळ कुर्ला (Kurla) येथे घालवला.

त्यानंतर पून्हा ते मालाड (Malad) येथे आले. त्या ठिकाणी १ लाख २० हजाराचा आयफोन (iPhone) मोबाइल त्यांनी घेतला. अन्य खरेदीसाठी फिरत असताना, पोलिसांना दोघांचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना सुखरूप नांदेड पोलिसांकडे सोपवले. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक सध्या सर्वत्र सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT