Breaking: वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - देशामध्ये कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली असून यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. आत्तापर्यंत अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली आहे आणि सोबतच आपली प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

मुंबईत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत असतात तर या सोमवारी देखील त्या उपस्थित होत्या. त्यानंतर आज मंगळवारी (ता. 28 डिसेंबर) गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिलं की, मला आज कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी चाचणी सकारात्मक आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

SCROLL FOR NEXT