Narayan Rane  SaamTV
मुंबई/पुणे

Narayan Rane: तुम्ही लाचार पत्रकार, असे बाळासाहेबांचे वाक्य, नारायण राणेंनी संजय राऊतांविरोधात तोफ डागली

नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना जोरदार उत्तर दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : तुम्ही लाचार पत्रकार, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, असं म्हणत सुक्ष्म-लघु उद्योग मंत्री नारायण राणे संजय राऊतांवर बरसले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राऊतांवर टिकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या पत्रकारितेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले (Minister Narayan Rane Slams Shivsena MLA Sanjay Raut).

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. तसेच, त्यापूर्वी त्यांनी भाजपचे साडे तीन नेते तुरुंगात जातील असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर भाजप विरुद्ध संजय राऊत हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यानंतर आज नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना जोरदार उत्तर दिलं आहे.

"तुम्ही लाचार पत्रकार"

"हा माणूस शिवसेनेत आला कधी. 10 मे 1092 ला सामनात संपादक म्हणून आला. लोकप्रभात असताना याने पराक्रम केले. त्याने त्यावेळी बाळासाहेब यांच्या विरोधात अनेक मूलाखती लिहिल्या. माझ्याकडे लोकप्रभाचे सर्व अंक आहेत. साहेबांनी हा पत्रकार कसा आहे हे सांगितले, ते मी आज इथे बोलू शकत नाही. हा पत्रकार कशी अंतर्गत आग लावता येईल हे बघतो, असे साहेबांनी याला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तुम्ही लाचार पत्रकार, असे साहेबांचे वाक्य होते", असं म्हणत राणेंनी राऊतांवर तोफ डागलीये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT