Deepak Kesarkar News Saam Tv
मुंबई/पुणे

Deepak Kesarkar: धक्कादायक! मंत्री दीपक केसरकर यांना धमकी; खंडणीही उकळण्याचा प्रयत्न

Deepak Kesarkar News: मंत्री दीपक केसरकर यांना धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

Deepak Kesarkar News: मंत्री दीपक केसरकर यांना धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे. थेट मंत्री दीपक केसरकर यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने मंत्री दीपक केसरकरांकडून खंडणीही उकळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप भालेकरला अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी प्रदीप भालेकर याने मंत्री केसरकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी कार्यालयातील व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रदीप भालेकरला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी देखील प्रदीप केसरकरला आर्थिक मदत केली होती. काही दिवसानंतर केसरकरांनी मदत देण्यास थांबविली, त्यानंतर प्रदीप भालेकर तुमची माहिती उघड करतो, अशी धमकी देत होता. अशी माहिती तक्रारीत आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांना धमकी मिळण्याचे प्रकार वाढले आहे. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकी मिळाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. अफसर पाशा याने मंत्री गडकरी यांना धमकी दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील रागामुळे मंत्री गडकरी यांना धमकीचा फोन केला असल्याचं अफसर पाशाने पोलिसांना सांगितलं.

अफसर पाशा याला काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी जाळ पसरविण्यासाठी २००३-०४ मध्ये नागपुरात वास्तव्याला होता. नागपुरात राहत असताना काही लोकांच्या भेटी देखील घेतल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

अजितदादांचा 100 टक्के घातच; 'जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत...', राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT