eknath shinde and dada bhuse  saam tv
मुंबई/पुणे

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय...'; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री भुसे यांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालायाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रदीप भणगे

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आहे. तर मुंबई उच्च न्यायालायाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळाव्यावरून चांगलाच संघर्ष पेटला होता. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यावर दावा केला होता. मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली होती.त्यामुळे दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या याचिकेवर सुनावणी केली.

मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या याचिकेवर निर्णय दिला. आज मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाने ऐकला. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला परवानगली दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना मंत्री दादा भुसे म्हणाले, 'न्यायालयाचा निर्णय आपण स्वीकारत असतो. हे माझं व्यक्तीगत मत आहे. शिवाजी पार्क मैदानापेक्षा बीकेसी हे मोठे मैदान आहे. आमचा शिवसेनेचा मेळावा कदाचित मैदानावर अपुरा पडला असता. याच्यापेक्षा, त्याच्यापेक्षा असा काही विषय नसतो शिवसैनिक आपापल्या पद्धतीने काम करत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील, ज्या मैदानावर मेळावा होईल, तो भव्य दिव्य होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Diwali Swapna Shastra: दिवाळीत जर 'ही' 3 स्वप्न दिसली तर समजा तुम्ही होणार श्रीमंत; देवी लक्ष्मी देत असते संकेत

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्र सरकारची माहिती

हर्बल हुक्का बार चालवायला परवानगी, कोर्टाने महाराष्ट्र पोलिसाला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

Tension At Shaniwarwada: शनिवारवाड्यात नमाज पठणानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला|VIDEO

SCROLL FOR NEXT