धक्कादायक! MIDC मध्ये स्फोटकं लावून ATM मशीन फोडले
धक्कादायक! MIDC मध्ये स्फोटकं लावून ATM मशीन फोडले रोहिदास घाडगे
मुंबई/पुणे

धक्कादायक! MIDC मध्ये स्फोटकं लावून ATM मशीन फोडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास घाडगे

पुणे : पिंपरी- चिंचवड Chinchwad पोलीस Police आयुक्तालयाच्या हद्दीत मध्ये असलेल्या चाकण Chakan एमआयडीसी MIDC परिसरामध्ये स्फोटकं लावून एटीएम ATM मशीन फोडल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, स्फोट घडवून चोरट्यांनी पैसे घेऊन पोबारा झाले आहेत.

स्फोटात एटीएमच्या खोलीच्या दरवाजाच्या काचा आणि पत्रे लांबपर्यंत उडून पडले आहेत, यावरुन या भीषण स्फोटाच Explosion अंदाज लावता येणार आहे. दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामधील चाकण एमआयडीसी परिसरामधील आंबठान गावानजीक हिताची कंपनीचे एटीएम आहे. मध्यरात्री या एटीएममध्ये अचानक स्फोट झाला आहे.

हे देखील पहा-

एटीएम सेंटर मध्ये करण्यात आलेल्या या स्फोटामुळे Explosion परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज पोलिसांनकडून Police वर्तवला जात आहे. स्फोटामध्ये एटीएम ATM मशिनचा अर्धा भाग फुटला आहे. काचांचा glass चक्काचूर देखील झाला आहे.

स्फोटाने मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली आहे तर काही रक्कमही न फुटलेल्या भागात सुरक्षित राहिली आहे. पण, मशीनमध्ये एकूण किती प्रमाणात रक्कम होती आणि चोरीला किती गेली हे आजून देखील समजू शकल नाही. यादरम्यान, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी स्फोटाचे नेमकं काय कारण शोधण्यासाठी श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soni Razdan News : आलिया भट्टच्या आईसोबत झाला मोठा स्कॅम, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला

Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO

Constable Vishal Patil Death Case: विशाल पवार मृत्यू प्रकरणात, शवविच्छेदनातून चक्रावून टाकणारी माहिती उघड

Benifits of Fruit Peel: फळांच्या सालीचे त्वचेसाठी जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Papaya Side Effects : 'या' व्यक्तींनी पपयी खाणे आजच बंद करा; अन्यथा रुग्णालयातील खर्चासाठी तयार राहा

SCROLL FOR NEXT