mhada Saam tv
मुंबई/पुणे

सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या ११८ घरांच्या नोंदणीला सुरुवात होणार, अर्ज कुठे कराल?

mhada affordable house : सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या ११८ घरांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे.

Vishal Gangurde

म्हाडाकडून ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आलीये

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर घरे उपलब्ध होणार आहे

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाइन अर्ज सुरू

संजय गडदे, साम टीव्ही

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ११८ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती हाती आली आहे. म्हाडाचं घर घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आलंय.

प्लॅट सोडतीत जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा यात समावेश करण्यात आलाय. म्हाडाकडून सुरुवातीला ३ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा आणि सदनिका निश्चिती करण्याची प्रक्रिया ४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. तर सदनिका निश्चित केल्यानंतर ४८ तासांच्या आत विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. वेळेत रक्कम न भरल्यास सदनिकेवरील दावा रद्द होईल आणि अनामत रक्कम जप्त केली जाईल.

कोणत्या भागात घरे असणार?

या योजनेत शिंपोली (कांदिवली), चारकोप, अँटॉप हिल-वडाळा, तुंगा-पवई, मानखुर्द, मालवणी, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि जेव्हीपीडी (अंधेरी पश्चिम) या भागांतील घरे उपलब्ध असणार आहेत.

पात्रता काय?

अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे आणि तो भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील किमान १५ वर्षांचा सलग अधिवास प्रमाणपत्र (जानेवारी २०१८ नंतरचे व बारकोड असलेले) आवश्यक आहे. आधार, पॅन, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तसेच आरक्षण प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रे बंधनकारक आहेत. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीनेच (NEFT/RTGS/नेट बँकिंग/UPI/डेबिट-क्रेडिट कार्ड) करावे लागणार आहेत. १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम ९० दिवसांत भरावी लागेल. मुदतवाढ घेतल्यास नियमानुसार व्याज आकारले जाईल.

म्हाडाने कोणताही एजंट नियुक्त केलेला नसून, नागरिकांनी कोणत्याही दलालांपासून सावध राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक ९८६९९८८००० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT