MHADA News Saam Digital
मुंबई/पुणे

MHADA News : बीडीडी चाळीतील ७०० रहिवाशांचं होणार शिवशाही प्रकल्पाच्या घरात स्थलांतर

MHADA News : रिकाम्या केल्या जाणाऱ्या बीडीडी चाळीतील सुमारे ७०० रहिवाशांना शिवशाही प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून सदरची घरे संक्रमण शिबिरासाठी वापरण्याची योजना आखली आहे.

Sandeep Gawade

MHADA News

म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गा येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले आहे. सदर पुनर्विकासाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे रिकाम्या केल्या जाणाऱ्या बीडीडी चाळीतील सुमारे ७०० रहिवाशांना शिवशाही प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून सदरची घरे संक्रमण शिबिरासाठी वापरण्याची योजना आखली आहे.

सध्या बीडीडी चाळीच्या जागेवर टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यासाठी सध्याच्या बीडीडी चाळी खाली केल्या जात आहेत. इमारत खाली केल्यानंतर संबंधित रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते किंवा ज्यांना संक्रमण शिबिरात तात्पुरत्या निवासासाठी घर नको आहे, त्यांना २५ हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. दरम्यान शिवशाही प्रकल्पांतर्गत उभारलेली ७०० घरे उपनगरातील कुर्ला, कांदिवली, मालाड, चांदीवली, मानखुर्द येथे असून ती संक्रमण शिबिरासाठी घेण्याची म्हाडाची योजना आहे. त्यासाठी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात घर हवे आहे. त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिपेअर बोर्डाला तुर्तास घरांची आवश्यकता नाही

शिवशाही प्रकल्पाची घरे म्हाडाच्या माध्यमातून इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला देण्यात येणार होती. मात्र सदर घराची त्यांना तुर्तास आवश्यकता नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदरची घरे बीडीडी चाळीतील रहिवाशांकरीत संक्रमण शिबीर म्हणून वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT