Car Sales Decline  Saam TV
मुंबई/पुणे

Car Sales Decline : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार आणि बाईक खरेदीमध्ये मोठी घट; मुंबईकर का टाळतायत वाहन खरेदी ?

Metro Effect : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदीमध्ये ५० टक्क्यांची घट झाली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Metro : गुढीपाडवा सणानिमित्त दरवर्षी व्यक्ती सोने चांदीसह नवीन वस्तू खरेदी करताना दिसतता. सुरुवातीला अनेक घरांमध्ये गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत कार किंवा दुचाकी खरेदी केली जात होती. मात्र आता कार खरेदीचं हे प्रमाण हळू हळू कमी होत चाललं आहे. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदीमध्ये ५० टक्क्यांची घट झाली आहे. तसेच बाईक खरेदी देखील २८ टक्क्यांनी कमी झाली आहे. (Metro Effect)

मुंबई मेट्रोमुळे कार खरेदीकडे नागरिकांनी फिरवली पाठ

मुंबईमध्ये आता मेट्रोचं जाळं हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रवासात मोठा दिलासा मिळतोय. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याने वाहतूक कोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता नागरिक कार किंवा दुचाकी खरेदी करणे टाळताना दिसत आहेत. कार खरेदीचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. तर दुचाकी खरेदीचे प्रमाण २८ टक्क्यांनी कमी झाले आहे.

सार्वजनिक वाहतुकीला मुंबईकरांची पसंती

मुंबईमध्ये आतापर्यंत मेट्रो १, २ A आणि मेट्रो ७ सुरू झाले आहेत. आता लवकरच मेट्रो ३ देखील येत आहे. मेट्रोचे जाळे मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी पेक्षा नागरिक सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निवडत आहेत.

वाहनांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ

महागाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. वाढत्या किंमती लक्षात घेता वाहनांवर इतका खर्च करणे सामान्य नागरिकांना परवडत नाही. तसेच पेट्रोलच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे देखील नागरिक खासगी वाहन खरेदी टाळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT