Palghar News Saam Tv
मुंबई/पुणे

वाणगाव डहाणू दरम्यान आज मेगाब्लॉक; अनेक सेवा रद्द तर काही सुरू

काही रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही सेवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर - पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही सेवा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. आज अप मार्गावर सकाळी 8:15 ते 9:15 वाजेपर्यंत 1 तासाचा मेगाब्लाँक तर डाऊन मार्गावर सकाळी 6:30 ते दुपारी 1:30 पर्यंत 8 तासांचा मेगाब्लाँक घेण्यात येणार आहे.

यादरम्यान बांद्रा जम्मूतावी स्वराज एक्सप्रेसला वाणगाव व डहाणू रोड स्थानकात थांबा दिला जाईल, बांद्रा अमृतसर पश्चिम एक्सप्रेस ला वाणगाव स्थानकात थांबा दिला जाईल. बांद्रा सुरत सुपरफास्ट इंटरसीटी, सौराष्ट्र एक्सप्रेस,सकाळी 11.30 ची विरार वलसाड शटल, बांद्रा वापी पँसेंजर, चर्चगेट डहाणू रोड, बोरीवली डहाणू रोड लोकल, डहाणू रोड बोरीवली मेमू, वापी विरार शटल, डहाणू रोड दादर लोकल, डहाणू रोड विरार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हे देखील पाहा -

वांद्रे गोरखपुर एक्सप्रेस वापी पर्यंतच राहील, मुंबई सेंट्रल अहमदाबाद गुजरात एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते उंबरगाव स्थानकादरम्यान रद्द करण्यात आली आहे. ती उंबरगाव स्थानकातून सुटेल. सुर्यनगरी एक्सप्रेस बांद्रा ते सुरत स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती सुरत स्थानकातून सुटेल. कर्णावती एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते वापी स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती वापी स्थानकातून सुटेल.

बोरीवली वलसाड मेमू ही बोरीवली ते डहाणू स्थानकादरम्यान रद्द करण्यात आली असून ती डहाणू रोड स्थानकाहून सुटेल. डोंबीवली-बोईसर मेमू ही पालघर ते बोईसर स्थानकादरम्यान रद्द असून ती पालघरला टर्मीनेट होईल. विरार डहाणू, चर्चगेट डहाणू,अंधेरी डहाणू या अप-डाऊन मार्गाच्या लोकल वाणगाव व बोईसर स्थानकापर्यंत थांबणार आहेत व तेथूनच त्या सुटतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT