Railway Megablock Saam Tv
मुंबई/पुणे

Megablock News: मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक चेक करा

मध्य रेल्वेवर सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

MegaBlock News: मुंबई लोकल ट्रेन सेवेच्या वाहतुकीवर आज काही काळ परिणाम होणार आहे. कारण मध्य आणि हार्बर रेल्वे आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत लोकल वाहतूक तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक उशिरानं होणार आहे. (Railway News)

मध्य रेल्वेवर सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. विद्याविहार आणि ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

पनवेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील सेवा १०.३३ ते ३.४९ वाजेपर्यंत आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर हार्बर मार्गावरील सेवा ९.४५ ते ३.१२ वाजेपर्यंत बंद राहील. पनवेल ते ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३३ ते ३.४९ वाजेपर्यंत आणि ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते ३.२० वाजेपर्यंत बंद राहील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

विमान अपघातातील वैमानिकाचा फोटो व्हायरल, कॅ. सुमीत कपूर यांचा फोटो असल्याचा दावा

आयकर विभागने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT