Mega Block Saam tv
मुंबई/पुणे

Railway Mega block: रविवारी 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक, जाणून घ्या

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठाणे- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ८.१६ ते सायंकाळी ४.१७ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हे देखील पहा -

कल्याण येथून सकाळी ८.४० ते सायंकाळी ४.५८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.५४ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

SCROLL FOR NEXT