तुमची ताईगिरी तुमच्याजवळ आम्हाला शिकवायला जावू नका; महापौरांचा चित्रा वाघ यांना इशारा SaamTV
मुंबई/पुणे

तुमची ताईगिरी तुमच्याजवळ आम्हाला शिकवायला जावू नका; महापौरांचा चित्रा वाघ यांना इशारा

'तुमची ताईगिरी भाईगिरी चालणार नाही'

Jagdish Patil

मुंबई : "राज्यात महिलांवरती रोजच अत्याचार सुरू आहेत. एकापाठोपाठ एक घटना घडत आहेत आधी डोंबिवली (Dombivli) मध्येआता कल्याणमध्ये. ही विकृती कुठून येते? या नराधमांच धाडस कसं होतं असे अत्याचार करायला महाविकास आघाडी सरकार (MVA goverment) हे अत्याचार करणाऱ्यांना मोकाट सोडण्याचं काम करत आहे" असा आरोप भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवरती केला. तसेच महापौर ताई बोरिवलीला पोचलात, पण मग डोंबिवलीला का नाही असा सवाल चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) विचारला होता यावरती प्रतिक्रिया देताना 'तुमची ताईगिरी भाईगिरी चालणार नाही' असा टोला महापौरांनी वाघ यांना लगावला आहे. (Mayor's warning to Chitra Wagh)

ताईगिरी भाईगिरी चालणार नाही

ताई गिरी भाई गिरी चालणार नाही चालणार नाही तुमची ही ताईगिरी तुम्हाला लखलाभ असो मात्र आम्हाला शिकवायला जावू नका असा इशाराच महापौरांनी वाघ यांना दिला आहे. "चित्रा वाघ यांना जरा प्रोटोकॉल (Protocol) समजावून सांगा. मी मुंबईची महापौर असल्यानं मुंबईत जिथं जिथं बरं वाईट घडत अशा ठिकाणी मी जातच असते आणि मी डोंबिवलीतही जाईन पण त्या सांगतायत म्हणून मी नाही जाणार" असं महापौर म्हणाल्या.

तसेच बाहेरून येवून अजेंडा चालवायची तुमची काम सुरु आहेत ती करा अजेंडाही चालावा. पण 'जास्त भाईगिरी नाही करायची'. असा इशारा वजा दमच महापौरांनी दिला आहे. तुम्ही आम्हाला नाही शिकवायचं कुठं जायचं ते असही महापौर म्हणाल्या. शिवाय ज्या प्रमाणे बाडगे जोरात बांग देतात, तसं यांच काम आहे आणि यांच्यासारख आम्हाला खोटे खोटे रडणं जमत नाही असं म्हणत चित्रा वाघ यांच्यावर चांगलाच हल्लाबोल महापौर किशोरी पेडणेकरांनी केलेला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT