Samriddhi Highway Saam TV
मुंबई/पुणे

Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर सुस्साट प्रवास! कोणती गाडी किती वेगाने धावणार? शासनाकडून वेगमर्यादा निश्चित

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर कमाल 120 किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) गाड्या सुस्साट धावणार आहेत. कारण शासनाने समृद्धी महामार्गावर गाड्यांसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. यासाठी राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. गाड्यांसाठी 100-120 किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र यामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाहनांच्या प्रकारानुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर कमाल 120 किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

वाहनांनुसार कशी असेल वेगमर्यादा?

>> 8 प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 120 किमी/तास वेगमर्यादा.

>> 9 पेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 100 किमी/तास वेगमर्यादा.

>> सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला 80 किमी/तासांची वेगमर्यादा.

>> समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी रिक्षाला परवानगी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT