Maval Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Maval News: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! गर्भपात करताना महिलेचा मृत्यू, मृतदेहासह २ मुलांना इंद्रायणी नदीत जिवंत फेकले

Talegaon MIDC Police Station: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले आहे. महिलेचा गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आला.

Priya More

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी मावळमधून समोर आली आहे. गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आला. या महिलेच्या दोन मुलांना देखील नदीमध्ये जिवंत फेकून देण्यात आले. या तिघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले आहे. मावळमध्ये अनैतिक संबंधातून एक महिला गरोदर राहिली. या महिलेचा गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतेदह थेट मावळमधील इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आला. या घटनेमुळे मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देत असताना तिच्या दोन लहान मुलांनी जोरजोरात रडायला सुरूवात केली. त्यामुळे आरोपींनी या दोन्ही चिमुकल्यांना देखील इंद्रायणी नदीमध्ये जिवंत फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिस तिघांचा देखील शोध घेत आहे.

याप्रकरणी आंबी एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीच्या साथीदाराच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणाचा अधीक तपास पोलिस करत आहेत. याप्रकरणातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT