nalasopara fire news Saam TV
मुंबई/पुणे

Nalasopara Fire News: नालासोपाऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग; ६ मालवाहू ट्रक जळून खाक

Nalasopara News Today: नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना बुधवारी (३१ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये ६ मालवाहू ट्रक जळून खाक झालेत.

Satish Daud

Nalasopara Latest Marathi News

नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना बुधवारी (३१ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. क्षणार्धात आगीच्या विळख्यात ६ मालवाहू ट्रक जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालवाहू ट्रक जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील पाकिंगमध्ये उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला.

या ट्रकमध्ये केमिकल असल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. बघता-बघात आगीने रौद्ररुप धारण करत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर वाहनांना विळखा घातला. आग इतकी भीषण होती, की हवेत दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. (Latest Marathi News)

तसेच आगीच्या भडक्याने एक ते दीड किलोमीटर मीटरच्या अंतरावरील बंगल्यांचे काच फुटले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलींगचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Maharashtra News Live Update: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT