Mankhurd Fire : मुंबईतील मानखुर्दच्या भंगार गोदामाला भीषण आग Saam Tv
मुंबई/पुणे

Mankhurd Fire : मुंबईतील मानखुर्दच्या भंगार गोदामाला भीषण आग

मुंबईतील मानखुर्द परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण आग

जयश्री मोरे

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण आग Mankhurd Fire लागली आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास मानखुर्द परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग scrapyard लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हे देखील पहा-

ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या मोठ- मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब- लांबून दिसत होते.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात झाली आहे. या भीषण आगीचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आणि त्यासोबतच शेजारील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या घरातील गॅस सिलिंडर देखील तात्काळ घरातून बाहेर काढण्याच्या सूचना केले जात आहेत. जेणेकरुन मोठी दुर्घटना होऊ नये.

अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करुन, आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. सध्या कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या ठिकाणी अशाप्रकारे आग लागण्याच्या याअगोदर देखील अनेकदा घटना घडले आहेत. अनेक अनधिकृत गाळे असल्याचा आरोप वारंवार होत असतात. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT