Corona Mask Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! राज्यात पुन्हा मास्क वापरणे गरजेचे; आरोग्य विभागाने दिल्या सूचना

कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने राज्यात आता पुन्हा मास्क वापरणे गरजेचं असल्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

सुमीत सावंत साम टीव्ही मुंबई

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात आता पुन्हा मास्क (Mask) वापरणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य (Department of Health) विभागाने एक पत्रक प्रसिद्ध केले असून, आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क वापरावे, असे म्हटले आहे.

मात्र, या ठिकाणी मास्क सक्ती नव्हे, तर मास्क वापरण्याचं आवाहन केलं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र, आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रात मात्र मास्क 'मस्ट' असा उल्लेख असल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत (corona Patients) झपाट्याने वाढ होत आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात ११३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे आता कोरोनाबाबत आरोग्य विभाग सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील पाहा -

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टास्क फोर्स सदस्यांसमवेत एका बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोना नियम पाळण्याचं आवाहन देखील केलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मास्क सक्ती करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र नागरिकांनी स्वत:च गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असं आवाहन केलं होतं. तसंच आवाहन आता आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, वाढत्या राज्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कालच चिंता व्यक्त केली होती. शिवाय राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे त्यामुळे जिल्ह्यातील टेस्टिंग, लसीकरण (Vaccination) वाढवण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना करणारं पत्र केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवंलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT