Pune : धक्कादायक! टेरेसवरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

Pune : धक्कादायक! टेरेसवरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोर ही इमारत आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या महिलेने टेरेसवरून खाली उडी मारली.

अश्विनी जाधव-केदारी साम टीव्ही पुणे

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून एका 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. राधिका पवन ससाने असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

हे देखील पहा :

महिलेच्या लग्नाला 10 वर्ष झाले असून तिला 2 मुलं आहेत, सिंहगड रस्ता परिसरातील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्स परिसरात ती महिला राहत होती. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोर ही इमारत आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या महिलेने टेरेसवरून खाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या महिलेने नेमकी आत्महत्या का केली असल्याची माहिती समोर आली नाही. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Stomach Heat Relief Remedies: उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करतील हे 7 घरगुती उपाय, पचनक्रियाही सुधारेल

Nagpur : वडील कामावर, आई घरकामात व्यस्त; खेळताना बादलीत पडली, १ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT