pune crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad: अपघाताचा बनाव रचत प्रियकराची हत्या, प्रेयसीच्या मुलीनंच केला प्रकरणाचा भंडाफोड

Woman Kills Boyfriend with Friends: विवाहीत प्रेयसीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं २८ वर्षीय प्रियकराची हत्या केली आहे. डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याची हत्या केलीय.

Bhagyashree Kamble

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही

पुण्यात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चिमुकल्या मुलासमोर पतीनं पत्नीची कात्रीनं हत्या करण्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये आणखीन एक हत्येची घटना घडलीय. विवाहीत प्रेयसीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं २८ वर्षीय प्रियकराची हत्या केली आहे. डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याची हत्या केलीय. या धक्कादायक घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बालाजी उर्फ बाळू मंचक लाडे असं मृत प्रियकराचे नाव आहे. प्रियकर बालाजी लांडे दारू पिऊन सतत त्रास देत असल्यामुळे प्रेयसीनं त्याची हत्या करण्याचं ठरवलं. आरोपी प्रेयसीनं आधी प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला. नंतर मित्रांच्या मदतीनं तिने प्रियकराची हत्या करण्याचं ठरवलं. प्रियकराला आधी घरात बोलावून घेतलं, नंतर डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने वार केले. ज्यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या मित्रांनी खोटा बनाव रचला. बालाजीचा अपघाती मृत्यू झाल्याचं भासवलं आणि प्रियकराचा मृतदेह रूग्णालयात नेलं. यावेळी त्यांनी खोटी नावे सांगितली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रेयसी आणि तिच्या मित्रांची चौकशी केली असता, प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश सूर्यकांत उपादे ,आदित्य शरद शिंदे याला अटक केली आहे. तर सहआरोपी प्रेयसी आणि अल्पवयीन मुलीला ही ताब्यात घेतलं आहे. तर या घटनेतील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांचा एक पथक बीड जिल्ह्यात रवाना झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT