nims dhillon saam tv
मुंबई/पुणे

Goa Crime News : गाेव्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून, युवतीसह युवकाने नवी मुंबई पाेलिसांना दिली गुन्ह्याची कबुली

ढिल्लों पंजाबच्या एका माजी मंत्र्यांचे नातेवाईक होते. ताब्यात घेतलेल्या युवक, युवतीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

गोवा राज्यात ज्येष्ठ नागरिकाची हत्या करुन पळून आलेल्या युवक आणि युवतीला नवी मुंबई पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दाेघांची कसून चाैकशी सुरु आहे. प्राथमिक चाैकशीत ज्येष्ठ नागिरकाची हत्या केल्याची दाेघांनी कबूली पाेलिसांना दिली आहे. या घटनेनंतर टाकण्यात आलेल्या दरोड्याचा गुन्हा देखील नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. (Maharashtra News)

मार्रा-पिळर्ण (Marra-Pilerne) येथील होरिझन्स आझुरा प्रकल्पमधील काही व्हिलांचे मालक असलेले निम्स ढिल्लों (nims dhillon) (वय 77, रा. कांदोळी, मूळ-पंजाब) यांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला हाेता. या प्रकरणाचा तपास गाेवा पाेलिस करीत हाेते.

दरम्यान नवी मुंबई गुन्हे शाखेने बिगर नंबर प्लेट असलेली एक संशयित कार वाशी-मुंबई टोलनाक्यावर तपासणीसाठी थांबवली. त्यावेळी चाैकशीत कारमधील लाेकांना समर्पक उत्तर देत आले नाही. पाेलिसांनी कारमधील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी कार चोरीची असून त्यांनी एकाची हत्या केल्याची कबुली पाेलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक गुन्हे शाखा आबासाहेब पाटील म्हणाले संशयितांचे नाव जितेंद्र साहू आणि राहुजा असे आहे.

त्यांनी गोवा येथील पोर्व्हरीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका व्हिलामध्ये एका जेष्ठ नागरिकाची हत्या करुन पळ काढला होता. निम्स ढिल्लाें असे मृताचे नाव आहे. सोशल मीडिया वरून त्यांची ओळख झाली होती. निम्स यांनी त्यांना गोवा फिरण्यासाठी आमंत्रण दिले होते.

त्यांनी गाेव्यात निम्स यांची हत्या करुन त्यांचे दागिने आणि गाडी घेऊन पळ काढला होता. बिगर नंबर प्लेटच्या गाडीमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. निम्स यांनी राहुजा सोबत गैरवर्तन केल्याने आम्ही त्यांची हत्या केल्याचे संशयितांनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT