resident doctors  Saam TV
मुंबई/पुणे

Resident doctors call off strike : निवासी डॉक्टरांचा संप मागे, राज्य सरकारने विद्यावेतन वाढवले

Resident doctors call off strike news in marathi : राज्य सरकारने विद्यावेतन वाढवल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. संप मागे घेतल्यानंतर निवासी डॉक्टर पुन्हा एकदा कामावर रुजू होणार आहेत.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Mard Doctors Organisations :

राज्य सरकारने विद्यावेतन वाढवल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. संप मागे घेतल्यानंतर निवासी डॉक्टर पुन्हा एकदा कामावर रुजू होणार आहेत. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्याची भूमिका जाहीर करत आभार व्यक्त केले. (Latest Marathi News)

राज्य सरकारने १० हजार रुपये विद्यावेतन वाढवल्यानंतर सेंट्रल मार्डने आभार मानले. सेंट्रल मार्डने पत्र लिहित म्हटलं की, राज्यातील सर्व नागरिक आणि मार्ड प्रतिनिधींचे आभार. या संपत सर्वांनी एकता दाखवली. त्यामुळे सर्व निवासी डॉक्टरांचा अभूतपूर्व विजय झाला आहे'.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफांचे मानले आभार

सेंट्रल मार्डने उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, एमईडीडीचे सचिव दिनेश वाघमारे , आयुक्त जीव निवतकर , डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांचं आभार मानले. वैद्यकीय शिक्षण मंत्रालय व संबंधित पदाधिकाऱ्यांनी तत्परतेने कामे करावीत. तसेच मागण्या अधिकृतपणे मान्य झाल्याची खात्री करा, असेही मार्डने म्हटलं.

मार्डने संप मागे घेतल्यानंतर 4 हजार निवासी डॉक्टर पुन्हा कामावर रुजू होणार आहेत. २२ फेब्रुवारीपासून मार्डचे डॉक्टर संपावर गेले होते.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय होत्या?

१. कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह निवासाची उपलब्धता करून द्यावी.

२. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत थकबाकी असलेले विद्यावेतन मंजूर करावे.

३. निवासी डॉक्टरांच्या बँक खात्यात विद्यावेतनाचे पैसे यावेत.

४. केंद्रीय संस्थांप्रमाणेच विद्यावेतनाच्या रकमेत वाढ करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT