MNS workers from Palghar detained in Dadar ahead of Thackeray brothers’ joint rally  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

Shiv Sena MNS Marathi Vijay Sabha MNS worker Detained LIVE Updates : पालघर येथून मेळाव्यासाठी वरळीकडे निघालेले मनसैनिक दादर परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Namdeo Kumbhar

Marathi vijay melava MNS worker Detained in dadar live updates : 'मराठी विजयी मेळाव्या'च्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. वरळी डोम येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते ऐतिहासिक क्षणासाठी दाखल होत आहेत. राज्यभरातून मनसैनिक आणि शिवसैनिक (उद्धव ठाकरे) मुंबईत दाखल होत आहेत. कार्यकर्ते जल्लोष करत दाखल होत असताना पालघरमधील मनसैनिकांना दादर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आजचा दिवस शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी ऐतिहासिक मानला जात असून, राज-उद्धव ठाकरे यांचं एकत्रित येणं महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देऊ शकतं.

मराठी विजयी मेळावा साजरा करण्यासाठी पालघरमधील मनसैनिक वरळीकडे निघाले होते. दादर येथून वरळीकडे जाणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघरमधील मनसैनिक तुलसी जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दादर परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. वरळी येथे होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैणात करण्यात आली आहे. चौका चौकात पोलिासांचा बंदोबस्त आहे. पालघरमधील मनसे सैनिकांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं ? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आज सकाळी १० वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. पालघरमधूनही शेकडो मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. सकाळची लोकलपकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मुंबईत दाखल झाले. पण त्यांना दादर परिसरात पोलिासांनी ताब्यात घेतले आहे.

मनसैनिक मुंबईकडे रवाना -

राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईमधील वरळी डोमकडे जाण्यास निघाले आहेत. वाजत आणि गाजत, मराठीचा जल्लोष करत कार्यकर्ते रवाना होत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणाहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या लोकलमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. प्रत्येक मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या दशकभरापासून ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी मागणी सुरू होती, त्याचा पहिला अंक आज होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT