Marathi vs Hindi Clash  saam tv
मुंबई/पुणे

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Marathi vs Hindi Clash: महाराष्ट्रात मराठीद्वेष्ट्यांची हिंमत वाढलीये. राजरोसपणे मराठीला नाकारणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेय. त्यात मीरारोडमध्ये परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा काढतायत. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

राज ठाकरेंनी हे आदेश दिले आणि महाराष्ट्र सैनिकांनी मराठी संवर्धनाची चळवळ आक्रमकपणे पुढे न्यायला सुरुवात केली. कुठे हात जोडून तर कुठे हात सोडून.. मराठी द्वेष्ट्याना मनसेनं चांगलंच वठणीवर आणलंय. पण मिरारोडमध्ये झालेल्या एका घटनेनं मराठी संवर्धनाच्या चळवळी विरोधात परप्रांतियांची वळवळ सुरु झालीये.

महाराष्ट्रात सब चलता है असं हेकडीत म्हणणाऱ्या या व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल हिसका दाखवला आणि मग मिरारोडमध्ये परप्रांतिय व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला..महाराष्ट्रात राहून मराठीच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत येते तरी कुठून असा प्रश्न आता विचारला जातोय.

ही दृष्य नीट निरखून पाहा, हा मोर्चा पाहील्यावर तुम्हाला असं वाटेल हे दृष्य आपल्या मिरारोडची आहेत की गुजरातच्या मोरबीची. याच मराठी द्वेष्ट्यांना स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांनी पाठिंबा दिलाय का असा प्रश्नही उपस्थित झालाय त्याला कारण त्यांचे ट्विट.. (ट्विटचा फोटो लावा) त्यात ते ' एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरुन त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करते असं म्हणतायेत. मोर्च्यातील व्यापारी काय इशारे देतायेत तेही ऐका.

हा मोर्चा आणि हा इशारा जरी मनसेला असला असं तुम्हाला वाटलं तरी या आडून विरोध मात्र मराठीला होतोय. ज्या महाराष्ट्रासाठी 105 हुताम्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्याच मायभूमीत आज मराठी विरोधात मोर्चे काढले जातायेत. मिरारोडच्या या तापलेल्या मुद्द्यावर मनसेनं काय प्रतिक्रीया दिलीये पाहा.

यात मुंबईतील मालाडमध्ये भर रस्त्यात मार खाणारा हा आहे सुशांत माळवदे मनसेचा कार्यकर्ता.. त्यांना अनधिकृत परप्रांतिय फेरीवाल्यांनी जीवघेणी मारहाण केली होती आज या मोर्च्यांतून आणि इशाऱ्यातून महाराष्ट्रात मराठी संकटात आलीये. खरं तर मुंबईनं परप्रांतियांच्या अनेक पिढ्यांना पोसलय. मुंबई हीच त्यांची कर्मभूमी. इथल्याच मराठी माणसासोबत धंदा करुन यांनी पैसा कमावला.

मुंबईचा पैसा चालतो तर मग मराठीचं वावडं का ? मराठी बोलण्यासाठी कमीपणा का..मुंबईतच राहून मराठीचा व्देष करण्याची ही हिंमत येते कुठून हा खरा सवालये. त्यामुळे मराठी द्वेष्टयांसोबतच त्यांची हिंमत वाढवणा्यांच्या नाग्या ठेचण्याची हीच ती वेळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: 'या' दिवशी लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT