Maratha Youth Joins Manoj Jarange Protest Despite Mothers Death  Saam tv news
मुंबई/पुणे

मराठा तरूणावर दु:खाचा डोंगर, ३ दिवसांपूर्वी आईचं निधन, पण तरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबई गाठली

Maratha Arakshan Mumbai: आईच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत धनंजय साखळकर आंदोलनात सहभागी. समाजासाठी काम करा, ही आईची इच्छा होती. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मराठा आरक्षण लढ्यात सहभाग.

Bhagyashree Kamble

  • आईच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत धनंजय साखळकर आंदोलनात सहभागी.

  • समाजासाठी काम करा, ही आईची इच्छा होती.

  • वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मराठा आरक्षण लढ्यात सहभाग.

  • आंदोलन संपल्यानंतर उर्वरित विधी करण्याचा निर्णय.

कौटुंबिक दु:ख बाजूला ठेवून एका मराठा तरूणानं मराठा आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. घरात आईचे चार दिवसांपूर्वी निधन झाले होते. कौटुंबिक दुःख बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी तरूण मुंबईत आला. समाजाचा झेंडा खांद्यावर घेत माळशिरस तालुक्यातील तरूणानं थेट मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनस्थळ गाठलं. सध्या या तरूणाचं विशेष कौतुक होत आहे.

ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक मराठा पेटून उठला आहे. राज्यातील विविध भागातून मराठा बांधवांनी मुंबई गाठली. आझाद मैदानावर आज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. मराठा बांधवांनी एकजूट होत मुंबई गाठली असून, भगवं वादळ पाहायला मिळत आहे.

मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यामुळे ते सुरूवातीला मुंबईत जाऊ शकले नाहीत. मात्र, आईच्या निधनानंतर तीन दिवसांचे विधी पार पडल्यानंर साखळकर यांनी मुंबई गाठली.

त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी साखळकर यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला ' माझ्या आईने नेहमी समाजासाठी पुढे राहा, असं सांगितलं होतं. तिची हीच खरी इच्छा होती. म्हणूनच मी या आंदोलनात सहभागी झालोआहे', असं साखळकर म्हणाले.

आंदोलन संपल्यानंतर आईचे उर्वरित विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक दु:खावर मात करत समाजासाठी लढा देणाऱ्या त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT