मराठा महासंघात फूट?, सरचिटणीस राजेंद्र कोंढरेची हकालपट्टी Saam TV
मुंबई/पुणे

मराठा महासंघात फूट?, सरचिटणीस राजेंद्र कोंढरेची हकालपट्टी

मराठा महासंघातून राजेंद्र कोंढरेची हकालपट्टी करण्यात आली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी याबाबत चे पत्र काढले आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: मराठा महासंघातून राजेंद्र कोंढरेची हकालपट्टी करण्यात आली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी याबाबत चे पत्र काढले आहे. महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शशिकांत पवार आहेत, तर राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे होते. 2019 मध्ये जी बैठक झाली होती त्यानुसार 2022 पर्यन्त या नियुक्त्यांचा कार्यकाल होता. राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात परस्पर बैठक घेतली, स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले, त्यामुळे शशिकांत पवार यांनी पत्रक काढून महासंघाच्या घटना नियमांची पायमल्ली केली. विश्वासात न घेता स्वतःची आणि इतरांची नियुक्ती केली या कारणास्तव कोंढरे यांची मराठा महासंघातून हकालपट्टी केली आहे.

संघटनेच्या वतीने काढण्याता आलेल्या पत्रकात लिहिले आहे की, महासंघाच्या घटनेनुसार जर एखाद्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाच्या विरोधात गैरवर्तन केल्यास त्याला पदावरुन दूर करण्याचा अधिकार हा अध्यक्षांना कलम २० अन्वये देण्यात आला आहे. आणि याच कलमाच उपयोग करुन राजेंद्र कोंढरे यांटी सरचिटणीस पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT