Maratha Reservation Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड, VIDEO

Mumbai Crime News : मराठा आंदोलकांना एक मराठा, लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी मराठा आंदोलकांना एक मराठा, लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तरुणांना ताब्यात घेतलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सकाळी हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला. मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते हाता काठ्या घेऊन वाहनांची तोडफोड करताना दिसले. या कार्यकर्त्यांना गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची यावेळी तोडफोड केली.

गाड्यांच्या काचा कार्यकर्त्यांनी फोडल्या. त्याचवेळी पोलिसांनी मध्यस्थी करता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळत आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिघांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...

Home Facial: पार्लरला जाऊन न जाता घरच्याघरी फेशियल कसं करायचं? लिंबू, मधाच्या फेस पॅकने मिळवा ग्लोइंग स्कीन

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

निवडणुकांमध्ये पैशांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर होतोय; सुप्रिया सुळे संतापल्या, निवडणुका रद्द करण्याची मागणी|VIDEO

How To Clean Gas Burner: गॅसवरचा बर्नर कसा स्वच्छ करायचा?

SCROLL FOR NEXT