CM Eknath Shinde On Maratha Reservation Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळणार? काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

CM Eknath Shinde On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळणार? काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Satish Kengar

CM Eknath Shinde On Maratha Reservation:

'महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे सगळे प्रयत्न सुरु आहे.', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''मागच्या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळीही मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टात टिकलं, मात्र दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं.''

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''यामध्ये मी आता जाऊ इच्चीत नाही. मात्र यात ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या, त्या कोर्टासमोर मांडता आल्या नाहीत. ज्या त्रुटी कोट्याने दाखवल्या, ज्यात मराठा समाज मागास असताना, ते सिद्ध करण्यास अपयश आलं आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली आहे.''   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''सुदैवाने 13 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि त्यांच्या बेंचने ती पिटीशन दाखल करून घेतली आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, आम्ही मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष देऊ आणि चालू प्रक्रियेत ही पिटिशन लिस्ट करू. त्यामुळे ही बाब फार दिलासादायक आहे. मराठा समाजाला आधार देणारी आहे. यातच सरन्यायाधीश यांच्यासमोर जे तथ्ये आहेत, जी मागच्यावेळी मांडता आली नाहीत. मराठा समाज मागास आहे, हे आपण पाहिलं आहे आणि याचे पुरावे देखील आहे.'' (Latest Marathi News)

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना ह्या दुर्देवी आणि दु:खदायक, वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, अशी भावनिक साद देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT