Shivsena  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Political News : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शेकडो कामगारांचा भारतीय कामगार सेनेला 'जय महाराष्ट्र', कारणही सांगितलं...

Political News : मुंबई हॉस्पिटल, एक्सिस बॅंकनंतर मुंबईतील पंचतारांकित हॉटेल क्षेत्रातील शेकडो कामगारांनी आज राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. कामगारांचा भारतीय कामगार सेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांना संघटनेला जय महाराष्ट्र केला आहे. जेडब्ल्यू मेरिएट पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.

 मुंबई हॉस्पिटल, एक्सिस बॅंकनंतर मुंबईतील पंचतारांकित हॉटेल क्षेत्रातील शेकडो कामगारांनी आज राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला. जेडब्ल्यू मेरीट या पंचतारांकित हॉटेलमधील शेकडो कामगारांनी आज राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते आमदार किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मागील वर्षभरापासून शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेतृत्व कामगारांना वेळ देत नव्हते. अनेकदा कामगारांनी सचिन अहिर,अरविंद सावंत यांना कामगारांच्या संबंधित तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

आमदार किरण पावसकर यांनी म्हटलं, जेडब्ल्यू मेरिएटमध्ये भारतीय कामगार सेनेचे युनिट होतं. मागील तीन महिन्यांपासून हे मातोश्रीवर भेटायला जात होते, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून आमच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत कामगारांनी प्रवेश केला आहे. (Maharashtra News)

मुंबईतील हे पहिलं हॉटेल आहे, येथे 95 टक्के कर्मचाऱ्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. बॉम्बे हॉस्पिटलमधील लोक सोडून आले, ॲक्सिस बँकेतील लोक सोडून आले, आज हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा मोठा प्रवेश होत आहे. ही परिस्थिती त्यांच्यावर का आली? याचा अभ्यास उद्धव ठाकरे यांनी करावा, असंही किरण पावसकर यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT