Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

'भारत सरकारने मुस्लिम धर्मियांची माफी मागावी अन्यथा...'; ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक

ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.

सुरज सावंत

ठाणे - ठाणे पोलिसांची (Thane Police) वेबसाइटवर हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही पोलिसांची वेबसाइट हॅक(Website Hack) केल्यानंतर त्यावरून हॅकर्सनी सरकारला इशारा दिला आहे. 'भारत सरकार, तुम्ही वारंवार इस्लामच्या संदर्भात अडथळे आणता. तुम्हाला सहनशीलता कळत नाही. जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही,' असा मजकूर हॅकर्सने ठाणे (Thane) पोलिसांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे.

मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत.जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना या ग्रुपनं भारतावर सायबर हल्ला करण्याचं आवाहन केलं. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्य मुळे तसेच ज्ञानव्यापी मस्जिद आणि इतर मुस्लिम विरोधी विषयांच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे.

हे देखील पाहा -

पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार, या ग्रुपने "opspatuk" हे ऑपरेशन सुरू केले असून त्याचा अर्थ स्ट्राइक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश या सर्व वेब साईटवर देण्यात येत आहे.

यातून सरकार कडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे. यामुळे अनेक गोपनिय माहितीच्या आधारे अदृश्य आरोपी सरकारची डोके दुखी वाढवू शकतात. ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT