Many flights to Pune are cancelled, visibility in the air is low due to fog Saam TV
मुंबई/पुणे

Pune Airport News: देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द, प्रवासी ताटकळले; काय आहे कारण?

Pune Flight Cancel: दाट धुक्यांमुळे पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दृश्यमानता खालवल्याने देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे.

Satish Daud

Pune Flight Cancel News

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी पावसाच्या सरी, तर कधी थंडीचा प्रभाव जाणवत आहे. अशातच दाट धुक्यांमुळे पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दृश्यमानता खालवल्याने देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विमाने अचानक रद्द झाल्याने पुण्यातील (Pune News) लोहगाव विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून प्रवासी ताटकळत बसले आहेत. दाट धुके आणि खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती विमान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत धुक्यांची चादर पांघरली असून हवेतील दृश्यमानता खालावली आहे. धुक्यांची परिस्थिती पाहता पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट (Weather Alert) देखील जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतील दाट धुक्यामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दृष्यमानता कमी झाल्यामुळे गुरुवारी पहाटेच्या सत्रात पटना, अहमदाबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये जाणारी विमानाचे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे.

याशिवाय काही विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. दरम्यान, देशातील अनेक शहरं सध्या धुक्याच्या विळख्यात आहेत. पुढील तीन दिवस धुके आणि थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT