Manoj Jarange Patil 
मुंबई/पुणे

शेतकऱ्यांची पोरं रस्त्यावर आणि मंत्री स्विमिंग पूलमध्ये; जरांगे पाटलांचा घणाघाती हल्ला; फडणवीसांनाही दिला इशारा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांच्या मदतीची मागणी करत त्यांनी सरकारला इशारा दिला.

Namdeo Kumbhar

गरिबांची लेकरे आज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर बसली आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारकडून फक्त दौरे आणि दिखावा

राज्य सरकारवर आणि मंत्र्यांवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारने तरुणांना रस्त्यावर बसायची वेळ आणली आहे. सरकारचे मंत्री फक्त दौरे करत आहेत, स्विमिंग पूलमध्ये पोहतात आणि बांधावर जाऊन दुःखावर मीठ चोळतात. शेतात पाणी नाही, पोरांना नोकरी नाही आणि शिक्षक भरतीचा पत्ता नाही. दुष्काळात ५० किलोमीटरवर चारा छावण्या टाकल्या आहेत, मग जनावरांनी काय करायचे?

शेतकरी कर्जमाफी आणि मदतीची मागणी

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग ज्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात त्यांचे कर्ज सरसकट का माफ करत नाही? असा सवाल त्यांनी केला. "शेतकऱ्यांचा पीक विमा थकला आहे. सरकारने प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची मदत करावी, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र ओसाड पडलेला दिसेल," असा इशारा त्यांनी दिला. तसेच "दोन दिवस दोन घास नाही मिळाले तरी चालतील, पण कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नका," असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

माझ्या जवळच्या लोकांना उचलले जात आहे

आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले, मी फुटत नाही, म्हणून माझ्या आसपासच्या लोकांना धरले जात आहे. जे बोलत आहेत त्यांना उचलले जात आहे. गेल्या १५ दिवसांत माझ्या जवळचे कुठे गेले हे मला कळलेच नाही.

आरोपांवर बोलताना जरांगे म्हणाले की, गावातील लोकांबद्दल मी काही बोलणार नाही. आपण संयम बाळगायचा आहे, एक दिवस त्यांना पश्चात्ताप होईल. तरुणांनी महिलांविषयी बोलताना विचार करून बोलले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing In Hotel: हॉटेलमध्ये घुसून बेछुट गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, शहरात खळबळ

CEC ज्ञानेश कुमारांना हटवता येणार का? निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात काय दिलं उत्तर?

दुष्काळग्रस्तांसाठी डोंबिवलीकरांची मोठी मदत; मुख्यमंत्र्यांकडे दिला 1कोटींचा निधी

टेस्लानंतर आता भारतीयानं केली कमाल, तरुणानं बनवली फ्लाईंग कार

पुण्याचा बिहार होतोय? दिवसाढवळ्या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT