Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबईतील 3 मैदानांची मागणी, सकल मराठा समाजाकडून अर्ज दाखल

Manoj Jarange Patik Strike in Mumbai : मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलनाची भूमिका जाहीर केल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही आझाद मैदान आंदोलनासाठी मिळावं यासाठी मागणी केली.

सूरज सावंत

Manoj Jarange Patil News :

मराठा आरक्षणासाठी सरकारने दिलेली डेडलाईन हुकली आहे. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने जालना येथील अंतरवाली सराटी येथून पायी मुंबईच्या दिशेने येणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाने मुंबईतील तीन मैदानांची परवानगी मागितली आहे. आझाद मैदान, एमएमआरडीए बीकेसी मैदान आणि दादर शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील सकल मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्ठमंडळाने तीनही मैदानांची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलनाची भूमिका जाहीर केल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही आझाद मैदान आंदोलनासाठी मिळावं यासाठी मागणी केली.

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील उपोषणस्थळी मुंबईत या उपोषणावेळी ३ कोटी मराठा आंदोलक येईल, असा दावा देखील जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे एवढी मोठी गर्दी सामावून घेऊल अशा भव्य मैदानाची गरज सध्या मराठा आंदोलकांना आहे. आता आझाद मैदान, एमएमआरडीए बीकेसी मैदान आणि दादर शिवाजी पार्क मैदानापैकी कोणत्या मैदानाची परवानगी मराठा आंदोलनकांना मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आम्हाला तीन मैदाने लागतील. मुंबईतील शिवाजीपार्क, बीकेसी आणि आझाद मैदान हे तीन मैदाने लागतील. मात्र, आमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन्ही पैकी एका मैदानात होईल', असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

Raj Thackeray: किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून काढू; राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

SCROLL FOR NEXT