Pune Manchar ST bus accident latest news : पुण्यातील मंचरमध्ये एसटी बसच्या धडकेत अकरावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. मंचरमध्ये एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मंचर येथे प्राथमिक उपचार करून पुढील पुचारासाठी पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्याजवळील मंचर येथे पुणे नाशिक महामार्गावर महात्मा गांधी विद्यालयासमोर एसटी बसने दुचाकीला धडक दिली. महाविद्यालय व कॉलेज असतानाही महामार्गावर स्पीडब्रेकर नसल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार सातत्याने स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पण त्यावर कोणताही उपाय करण्यात आला नाही. अकरावीत शिकणाऱ्या मुलाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी मृताची ओळख वीर अनिल शिंदे (१७) असल्याचे सांगितले, तो अवसरी खुर्द येथील रहिवासी आहे. अपघाताच्या एक दिवस आधी वीरने आपला १७ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचा मित्र, साहिल टेमकर (१७) याला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस भालेराव (१७) याच्यावर मंचर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंचर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, वीर, साहिल आणि तेजस यांनी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून मंचर येथील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. सोमवार हा त्यांच्या महाविद्यालयाचा चौथा दिवस होता. ते घरी परतत असताना जुन्नर-कुर्ला मार्गावर धावणाऱ्या बसला त्यांच्या मोटरसायकलची धडक बसली. पोलिसांनी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मंचर बंधाऱ्यात विजेचा धक्का; शेतीपंप बसवताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील बंधारा परिसरात शेतीपंपाची मोटार बसविताना विजेचा धक्का लागून ३५ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत एक सहकारी किरकोळ जखमी झाला. आठवडाभरापूर्वी आलेल्या पुरामुळे घोड नदीपात्रातील शेतीपंप आणि विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले होते. पाऊस ओसरल्यानंतर मोटार बसविण्याचे काम सुरू असताना विलास केदारी यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत संतोष केदारी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी ५० हून अधिक शेतीपंप असून, नेमका कोणत्या केबलमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला याचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.