ठग ऑफ हिंदुस्थान! अधिकारी असल्याचं सांगून बड्यांना लुटणाऱ्याला बेड्या अमोल कविटकर
मुंबई/पुणे

ठग ऑफ हिंदुस्थान! अधिकारी असल्याचं सांगून बड्यांना लुटणाऱ्याला बेड्या

हरियाणा येथे सराफ व्यावसायिकांना कस्टम अधिकारी असं सांगून तब्बल १ किलो सोने लुटले होते.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

अमोल कविटकर

पुणे : पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिसांनी एका महाठगाला शिताफीने अटक केली आहे. जाफर अलिखान इराणी असं या आरोपीचं नाव असून तो कस्टम आणि पोलीस अधिकारी असल्याचं सांगून बड्यांना लुटत असे. (Crime News In Marathi)

तो पुण्यातील शिवाजीनगरमधील इराणी वस्तीत आल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती, त्यानंतर फौजफाट्यासह सापळा लावून अटक केली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा आणि दिल्लीत या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत.

हे देखील पहा-

हरियाणात तर जाफर इराणी मोस्ट वॉन्टेड (Most Wanted) होता. जाफर इराणी याच्यावर १५ ते २० गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. हरियाणा येथे सराफ व्यावसायिकांना कस्टम अधिकारी असं सांगून तब्बल १ किलो सोने लुटले होते. तर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका वाहन चालकाला अडवून पोलीस अधिकारी असल्याचं सांगून २७ हजार रुपये उकळण्यात आले होते. शिवाजनगर पोलिसांनी या महाठगाला अटक करुन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT