mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत पार्किंगवरून एकाला हॉकी स्टिकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

दोन रहिवाश्यांमध्ये पार्किंगवरून सातत्याने वाद होत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नवी (Mumbai) मुंबईतील खांदेश्वर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर या सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून एकाला मारहाण (Crime) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सोसायटीमध्ये सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या, दोघा गाव गुंडांनी त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका इसमाला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या दोन्ही रहिवाश्यांमध्ये वाहन पार्किंग वरून वारंवार वाद होत होते. मात्र या वादाचे रूपांतर आता तुंबळ हाणामारीत झाले आहे. या दोन गाव गुंडांनी हॉकी स्टिकने मारहाण केल्यावर पोलीस ठाणे गाठत आपल्यालाच मारहाण करण्यात आली असल्याची खोटी नोंद केली.

पण सीसीटीव्ही समोर आल्याने पोलीस देखील हैराण झाले. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन्ही गाव गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. तक्रारदारावर रुग्णालयात उपचार सुरू असून खांदेश्वर पोलीस (Police) फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Tourism: सांगलीमध्ये लपलाय 'हा' भव्य किल्ला; जाणून घ्या ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्यं

Maharashtra Live News Update: सीएसएमटी ते खोपोली जाणाऱ्या लोकलच्या पंख्यामधून अचानक निघू लागला धूर

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

Maharashtra Politics: गद्दारांशी युती नको, ठाकरेंचं फर्मान, ठाकरे-शिंदेसेना युतीवरून वादंग

Fact Check: बिबट्यांच्या जुन्नरमध्ये वाघाचा धुमाकूळ? वस्त्यांमध्ये फिरतोय आता पट्टेरी वाघ?

SCROLL FOR NEXT