Vasai news Saam TV
मुंबई/पुणे

Man Drown in Vasai : बिस्कीट आणायला घराबाहेर पडले, पण वाटेत मृत्यूनं गाठलं; वसईत नाल्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai news : ब्रायन कार्व्हालो (वय ४४) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Vasai News : घरासमोरील वाहत्या नाल्यात बुडून एका ४४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वसई पश्चिमेच्या गिरिज येथे ही दुर्घटना घडली आहे. ब्रायन कार्व्हालो ( वय ४४) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

ब्रायन हे वसई पश्चिमेच्या गिरीज येथील सातोडीवाडी येथे राहत होते. मुसळधार पाऊस (rain) पडत असल्याने आणि सर्वत्र पाणी साचल्याने ही दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास कार्व्हालो हे बिस्कीट आणण्यासाठी घराबाहेर पडले होते.  (Latest NEws)

मात्र घरासमोरील नाला ओलांडताना ते नाल्यात पडून वाहून गेले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता ते नाल्यात आढळले. कार्व्हालो यांना त्वरित उपचारासाठी वसईच्या बंगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकऱणी वसई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (Maharashtra News)

ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

दोन दिवसापूर्वी बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मीठ चौकी जवळील रेहान इंटरनॅशनल शाळेजवळ खाडीत हा मृतदेह आढळून आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला 19 तारखेला नॅशनल पार्कमधील ओढा ओलांडताना या तरुणाचा पाय घसरून ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT