लोखंडी सळईने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू Saam tv
मुंबई/पुणे

मन हेलावणारी घटना! लोखंडी सळईने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू

डोक्यात जबरी घाव लागल्यामुळे श्वानाचा जागीच मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - दत्तवाडी परिसरात मन हेलावणारी घटना घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने विनाकारण, एका भटक्या श्वानाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केली आहे. या श्वानाच्या डोक्यात जबरी घाव लागल्यामुळे श्वानाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका स्थानिक महिलेने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून दत्तवाडी पोलिसांनी आरोपी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

हे देखील पहा -

अमोल खेडकर असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. आरोपी हा दत्तवाडी परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी भारती साळुंखे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दत्तवाडी पोलिसांनी आरोपी खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी भारती साळुंखे यांच्या घराच्या परिसरात गेल्या दहा वर्षांपासून राणी नावाची श्वान राहात होती.

परिसरातील नागरिक या श्वानाला खायला टाकत असल्याचे. त्यामुळे हे श्वान याठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्याला होते. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी फिर्यादी आपल्या घरासमोर उभ्या होत्या. यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या या श्वानाला आरोपी खेडकर याने लोखंडी सळईने मारहाण केली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

फिर्यादीच्या डोळ्यादेखत श्वानाने आपले प्राण सोडला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT