Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: मल्हारगडावर कपलचा रोमान्स, अश्लील चाळे करताना VIDEO काढला; दुर्गप्रेमीच्या डोक्यात दगडच घातला

Malhargad couple attack news: गडावर कपल रोमान्स करत होते. जोडप्याला रोमान्स करत असताना, दुर्गप्रेमीने पाहिले आणि हटकले. त्यावरच हल्ला चढवला.

Bhagyashree Kamble

पुण्यातील सासवड येथील मल्हारगडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. गडावर कपल रोमान्स करत होते. जोडप्याला रोमान्स करत असताना दुर्गप्रेमीने पाहिले आणि हटकले. हटकल्यामुळे कपलला राग अनावर झाला. कपलनं थेट त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात दुर्गप्रेमी गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

पुण्यातील सासवड येथे मल्हारगडावर एका जोडपं अश्लील चाळे करत होते. जोडपं अश्लील चाळे करत असताना एक दुर्गप्रेमी प्रमोद जगताप त्या ठिकाणी पोहोचला. त्यानं कपलचे काही फोटो आणि व्हिडिओ शुट केला आणि त्यांना हटकले.

व्हिडिओ आणि हटकल्याचा राग जोडप्याला आला. त्यानंतर कपलनं दुर्गप्रेमीला मारहाण केली. दोघांनी मिळून प्रमोदवर हल्ला चढवला. दगडाने ठेचलं आणि गळाही दाबला. या मारहाणीत तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रमोदला रूग्णालयात नेले. प्रमोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. गडावर अश्लील चाळे आणि दुर्गप्रेमीला मारहाण. या कारणामुळे सासवड परिसरातील नागरीकांना संताप अनावर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT