Acme Shopping Center Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

Malad Fire News: मालाडच्या अ‍ॅक्मे शॉपिंग सेंटरला लागली भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

Mumbai News: मुंबईच्या मालाड पश्चिमेकडे एका शॉपिंग अ‍ॅक्मेला आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साधारण पणे पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Acme Shopping Center Fire News:

मुंबईच्या मालाड पश्चिमेकडे एका शॉपिंग अ‍ॅक्मेला आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साधारण पणे पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. मालाड पश्चिमेकडील जैन मंदिर रोडवरील अ‍ॅक्मे शॉपिंग सेंटरला ही आग लागली आहे.

अ‍ॅक्मे शॉपिंग मॉल मधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्राला ही आग लागली असल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

शॉपिंग मॉलला लागलेली आग ही लेव्हल वनची आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांसोबात मालाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी देखील पोहोचले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागलेल्या इमारतीतून 17 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील निंभोरा स्टेशनवर रेल्वे २ तासांपासून खोळंबल्या

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT